कल्याण-नगर महामार्गावर पुलाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

रामदास सांगळे
विभागीय संपादक 
२८ जानेवारी २०२२

बेल्हे


पेमदरा (ता. जुन्नर) येथे कल्याण-नगर महामार्गावर गुरुवार (दि.२७) रोजी दुपारी दुचाकीचा अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. कृष्णकांत छबु गायकवाड ( वय-३६) (राहणार एमएसईबी कॉलनी,नागापूर, बोल्हेगाव जिल्हा अहमदनगर) येथील एकटाच तरुण एमएच ४३ बीजे ३४२४ क्रमांकाची युनिकाँन दुचाकीवरून नगरवरून कल्याणच्या दिशेने जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी पेमदरा गावा जवळील रस्त्यालगतच्या पुलाला जाऊन जोरात धडकली.तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. दुचाकी भरधाव वेगात असल्याने अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. सुनील दाते यांनी सदर तरुणाला ताबडतोप उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु त्याआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आळेफाटा पोलीस स्थानकात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.