डिंबे-माणिकडोह बोगदा प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे निवेदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

चिंचवड दि ९ एप्रिल २०२१
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाच्या डाव्या कालव्याखाली पुणे,नगर,सोलापूर जिल्ह्यातील 90 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पण डिंभे धरणाची पाणी मिळत नाही शिवाय माणिकडोह धरण दरवर्षी 60 ते 70 टक्के भरते त्यामुळे दरवर्षी 3 टी‌.एम‌.सी पाण्याची तुट येते. त्यामुळे डिंभे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी माणिकडोह धरणात सोडल्यास माणिकडोह धरणातील 3 टीएमसी पाण्याची तूट भरून काढणे शक्य होणार आहे. डिंभे धरणातून येडगाव धरणात6.25 टी‌.एम.सी पाणी सोडण्याची प्रकल्प विकास आराखड्यात तरतूद आहे‌‌. कालव्याद्वारे अवघे 2 ते 2.5 टीएमसी पाणी यडगाव धरतात येते. यावर डिंबे माणिकडोह बोगदा हा आणि हाच रामबाण उपाय आहे. यामुळे माणिकडोह धरणातील 3 टी‌‌.एम‌.सी पाण्याची तूट भरून काढता येईल. डिंभे धरणातुन 6.25 टीएमसी पाणी येडगाव धरणात येईल.त्यामुळे नगर सोलापूर मधील शेतकऱ्यांना दर वर्षी तीन आवर्तने मिळतील. येडगाव, डिंभे,माणिकडोह, पिंपळगाव जोग,व वडच या पाच धरणांचा समूह असलेल्या कुकडी प्रकल्पातील डिंबे ते माणिकडोह बोगद्यास केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली आहे.राज्य तांत्रिक सल्लागार समितीने यावर तीन बैठका घेतल्या. राज्यात गत विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना 3 हजार 900 कोटी रुपयांची कुकडी सुधार प्रकल्प विकास आराखड्याला मान्यता दिली होती. डिंबे माणिकडोह जोड बोगद्याचे टेंडर काढण्याबाबत आदेश झाले होते. मात्र राज्यात विधानसभा निवडणुका लागल्या त्यामध्ये फडणवीस सरकार जाऊन आपले महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आले. तेव्हापासून आजपर्यंत या बोगद्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील पारनेर,श्रीगोंदा, कर्जत,करमाळा तालुक्यातील शेतकरी व शेती व्यवस्थ