कृष्णा ते कृष्णकुमार गोयल..एक प्रेरणास्रोत कोहिनूर ” डॉ.अरुण अडसूळ

खडकी :
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक विद्यार्थी शिक्षण घेतो.त्यानंतर वडिलांकडून व्यवसायाची प्रेरणा आणि भांडवल घेऊन व्यवसायात उडी घेऊन प्रामाणिकपणे व सचोटीने स्वत:चे साम्राज्य निर्माण करतो .हे खरेच कौतुकास्पद आहे ,तसेच ज्या शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होणे हेच कृष्णकुमार गोयल यांचे वैशिष्ट्य आहे ” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांनी केले.
खडकी शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष मा. कृष्णकुमारजी  गोयल  यांचा ७०वा  वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये डॉ अडसूळ यांनी वरील प्रतिपादन केले.खडकी शिक्षण संस्था व कृष्णकुमार गोयलगौरव समितीच्या वतीने श्री गोयल याना मानपत्र देऊन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी  सामाजिक, , प्रशासकीय, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील,व कामगार क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील  सत्तर व्यक्तींचा श्री.गोयल यांचे हस्ते ‘कोहिनुर भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी एन.सी. सी च्या वतीने सलामी देऊन संस्थेतील 11 शिक्षिका भगिनींनी श्री.गोयल यांचे 70 दिव्यांनी ओवाळून औक्षण व रामरक्षा म्हणून वाढदिवस साजरा करण्यात आला. आणि याप्रसंगी कृष्णकुमार गोयल यांचा जीवनप्रवास चित्रित केलेली फिल्म दाखवण्यात आली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण अडसूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कृष्णकुमार गोयल गौरव समितीचे सदस्य संस्था उपाध्यक्ष अनिल मेहता, चिटणीस आनंद छाजेड, adv. अजय सूर्यवंशी,
ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा आदी सर्व मान्यवर संचालक उपस्थित होते.
यावेळी उत्सवमूर्ती श्री गोयल यांनी या  अभिनव  रीतीने केलेल्या सोहळ्याबद्दल  कृतज्ञता व्यक्त करून भावनिक होऊन सत्काराला उत्तर दिले.  आपल्या वडीलाकडुन 300 रु उसने घेऊन व्यवसाय उभा केला.अनेक प्रकारचे व्यवसाय केले.प्रामाणिकपणा  व सचोटीने उभारणी करून आज मी एका उंचीवर पोहचलो आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे.तुम्ही नुसती स्वप्ने पाहू नका ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटा.नक्कीच यशस्वी व्हाल.हे माझेच मूर्तिमंत उदाहरण आहे’असे सांगून टिकाराम  जगन्नाथ महाविद्यालयात 15 इंटरेऍक्टिव्ह बोर्ड देणगी दाखल दिले.प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी त्यांचा स्वीकार केला.  संस्था पदाधिकारी ,प्राचार्य ,सर्व विद्यार्थी ,शिक्षक यांचे आभार मानले. यावेळी श्री अशोक सोनवणे ,डॉ.बगाडे, Adv. रमेश पवळे यांनी मनोगत व्यक्त केले.चिटणीस आनंद छाजेड यांनी मानपत्राचे वाचन केले. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी संयोजन व सूत्र संचालन केले. प्राचार्या सरिता नायर आणि आभारप्रदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *