माहेर संस्थेच्या पाठीशी जनसामान्यांनी भक्कमपणे उभे राहावे : आमदार अशोक पवार

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
२७ जानेवारी २०२२

शिरूर


सिस्टर ल्युसी कुरियन यांनी सुरू केलेल्या माहेर संस्थेच्या देशभर अनेक शाखा असून, सर्व शाखा या विनाअनुदानित आहेत. शिरूर तालुक्यातील शिरूर व वढू बु. येथेही संस्थेच्या शाखा आहेत. यंदा, संस्था स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याने, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, संस्थेच्या विविध शाखांना व विशेषतः पुण्याजवळील वढू बु. येथील शाखेला भेटी देऊन शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिरूर – हवेलीचे आमदार, अशोक पवार यांनीही बुधवार दि. २६ जानेवारी २०२२ रोजी, वढू बु. येथे अनेक मान्यवरांच्या समवेत भेट दिली.

यावेळी संस्थेच्या सेवाभावी वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. तसेच, यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “श्री क्षेत्र वढू बु. येथील माहेर संस्था, ही गेली २५ वर्षापासून समाजातील उपेक्षितांना आधार व न्याय देण्याचे बहुमोल कार्य करीत असून, माहेर संस्थेच्या विविध शाखांमधून विविध वयोगटातील व्यक्तींना सामावून घेत, त्यांची प्रेम पूर्वक सेवा केली जातेय ही खूप प्रशंसनीय बाब आहे. माहेर संस्थेचे कार्य हे निःस्वार्थी वृत्तीचे असून, माहेर संस्थेच्या पाठीमागे जनमाणसांनी भक्कम उभे राहून, त्यांना आवश्यक ती मदत देत राहावी.”या कार्यक्रमाची सुरुवात व पाहुण्यांचे स्वागत, माहेरच्या मुलांनी स्वागत गीत गात व दीपप्रज्वलनाने झाली.

माहेरच्या संस्थापिका सिस्टर लूसी कुरियन व संस्थेच्या उपस्थित विश्वस्थांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर माहेरच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी, माहेरच्या २५ वर्षाच्या कार्याचा अहवाल सादर केला. तसेच, माहेरच्या सहामाही मासिकाचे अनावरण प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. माहेर संस्थेमध्ये १० – १५ वर्ष काम करत सेवा देणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना, प्रशस्तीपत्र व माहेरची शॉल देऊन गौरविण्यात आले. यावेळी, त्यांनी माहेर मधील आपल्या सेवेचे अनुभव सांगितले. तसेच माहेरच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत, तायक्वांदो कराटेचे प्रात्यक्षिकही सादर केले.

आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, विश्वस्त निकोला पवार, डॉ . शर्मा, मर्सी डिमेलो, अनिरुद्ध सर, वढू बु. च्या सरपंच सारीका अंकुश शिवले, सणसवाडीच्या सरपंच स्नेहल भुजबळ, नितीन गंगाधर (फूड अन बर्ग कंपनी), साहेबराव भंडारे, जयसिंग भंडारे, पोलीस पाटील संजय भंडारे, उत्तम भंडारे, लक्ष्मण भंडारे, सोमनाथ भंडारे, शंकर आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच संस्थेच्या मनमिळावू सेवक वर्गाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी रमेश दुतोंडे, एम जे मिनी, विजय तवर, आनंद सागर, अनिता भालेराव, शर्ली ऍंथोनी, नीता सूर्यवंशी, तेजस्विनी पवार, संगीता चौधरी, विष्णू सूर्यवंशी, प्रशांत गायकवाड, सुमित इंगळे, मंगेश पोळ, विक्रम भुजबळ, अतुल शेळके, राजेंद्र साकोरे आदी सेवकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले. तर आभार हरीश अवचर यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *