लोकशाही टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज : सचिन साठे

रोहित खर्गे
विभागीय संपादक 
२८ जानेवारी २०२२

पिंपरी


१८५७ पासून सुरु झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची फलश्रृती १९४७ ला स्वातंत्र्यप्राप्तीने झाली. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. हि लोकशाही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धोक्यात आली असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही मानणा-या लोकांनी आता लोकशाही टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज असल्याचे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केले. असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सचिन साठे बोलत होते. यावेळी सचिन साठे यांच्या हस्ते मिलिंद नगर, आंबेडकर कॉलनी, बौद्ध नगर, भाटनगर, पत्राशेड आदी भागातील असंघटित कामगारांना ई श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व शहर काँग्रेस असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिला प्रदेश कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, घरेलू महिला कॉंग्रेस प्रदेश समन्वयक शितल कोतवाल, शहर कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुध्दीन शेख, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग सचिव किशोर कळसकर, पर्यावरण विभाग महाराष्ट्र सचिव अशोक काळभोर, प्रदेश महिला काँग्रेस कार्यकारिणी सदस्या शोभा पगारे, पर्यावरण काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय शहरकर, ज्येष्ठ नेते संदेश नवले, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, कमला श्रोत्री, विशाल कसबे, फुले, शाहू, आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अशोक गायकवाड, ॲटो रिक्षा चालक मालक संघटना शहराध्यक्ष दिलीप साळवे, भिम शक्ती संघटना शहरकार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, राम डोंगरे, अशोक साबळे, देविदास साळवे, ज्योती सूर्यवंशी, कुसुम भोळे आदी उपस्थित होते.स्वागत सुंदर कांबळे, सूत्रसंचालन शितल कोतवाल आणि आभार वृषाली कदम यांनी मानले.