जुन्नर पंचायत समितीच्या भिंती लागल्या बोलू

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१० जानेवारी २०२२

ओझर


जुन्नर तालुका पंचायत समिती कार्यालय व परिसरातील भिंती आकर्षक भित्तीचित्रे व घोषवाक्यांनी बोलू लागल्या आहेत. गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी साहेब यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तालुक्यातील ३५ कलाशिक्षकांनी एकत्र येत आपले कलाकौशल्य पणाला लावत पंचायत समिती कार्यालय व परिसरातील भिंती ४० भित्तिचित्रे व घोषवाक्यांनी बोलक्या करीत अभियानाचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम या निमित्ताने केले आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या अनेक जनसामान्यांचे लक्ष वेधण्याचे काम या भिंती करीत आहे. तर अनेकांनी या कामाचे व कलाशिक्षकांचे कौतुक केले आहे.


यात सहभागी झालेले कलाशिक्षक सगर एस.एम., मिरगे पी.व्ही., तोडकर महेंद्र, जाधव आर.व्ही., सोनवणे एस.जी., खंडाळे एस.व्ही., रोकडे एस.आर., पाटील डी.एस., कोतवाल व्ही.एस., सूर्यवंशी पी.आर., थोरात एम.एम., गटकळ एस.व्ही., सदामते बी.बी., केदार आर.एस., मधे आर.एस., वाडकर एस.एस. साबळे बी.एन., कदम सुरेश, चिंतामणी पी.एन., शिंदे ए.बी., आनंदराव एन.के., कठाळे एस.एन., भगत अतुल, शिंदे गोरक्ष, फटांगरे डी., रावळ विनय, सौ.दांगट जे.जे., सौ.आहेर एस.पी., सौ.रोकडे डी.ए., सौ.टकले टि.एस., सौ.घाटकर आर.एस. या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या सर्वांना सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी किसन खोडदे, समन्वयक यश मस्करे यांचे विशेष सहकार्य लाभले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *