राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना रोपांचे वाटप…

राजगुरूनगर
प्रतिनिधी : अक्षता कान्हुरकर. राजगुरूनगर
दि. १० जुलै २०२१

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने राजगुरूनगर येथील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना रोपे भेट म्हणून देण्यात आली. खेड तालुका अध्यक्ष जिवन टोपे, उपाध्यक्ष राजेन्द्र सुपेकर, शिवव्याख्याते संदीप बारणे यांच्या वतीने खेड च्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजय जोशी, दोंदे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच दादासाहेब कोहिणकर, ग्रामसेवक निलेश‌ पांडे, भाऊ साहेब कडुस, ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास मुसळे, यांना एक झाड भेट देऊन दिव्यांगांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यात आली.  
                            तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांगांचा प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावा, मंचर जिल्हा उपकेंद्र आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत दिव्यांग सर्टिफिकेट देण्यासाठी मागणी करण्यात आली. दिव्यांगांना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सोयी सुविधा बाबत मंजूर प्रकरनाचे पैसे अजून टाकले नाही हि देखील समस्या सोडवावी या मागण्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्याकडे करण्यात आल्या.  


                            प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुक्यातील दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी आपणाकडून सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात तसेच यशवंत घरकुल योजनेचा मंजूर लाभार्थी यादी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळावी, अपंग निर्वाह भत्ता मागील वर्षी मंजूर यादी तालुक्यातील कोवीड परिस्थिती मुळे या वर्षी मंजूर करण्यात यावी, पंचायत समिती खेड ऑफिस मध्ये दिव्यांगांचे सोयी सुविधा योजना साठी अपंग कक्ष मंजूर करण्यात यावा, १४ व्या वित्तीय आयोगाचा नीधी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांगां दिव्यांगांसाठीच खर्च करण्याची सुचना करावी अशी मागणी देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *