महापालिकेकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रयोगशील शिक्षण सुरू

१८ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेकडून तीन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रयोगशील शिक्षण सुरू आहे. त्यात शिक्षण विभागाने ३ तास ३ तासिका आठवड्यातून दोनवेळा युट्युबचा वापर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने या प्रयोगशील ऑनलाइन शिक्षणात उत्कृष्ट शिक्षक योजना. विद्यार्थी आणि पालक यांच्यामार्फत मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पारितोषिक द्यावे. ३ तास ३ तासिका आठवड्यातून दोनदा ऑनलाइन युट्यूबचा वापर करत शिक्षण देणे. यामुळे शाळेतील अध्यापनाचा काही वेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरता येईल. समाजातील नामांकित व्यक्तींचे लेक्चर या बाबींचा अंतर्भाव करावा, या योजनेला शैक्षणिक क्रांतीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे. याबाबत संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. बायज्युससारख्या खासगी शिक्षण प्रणालीसारखे दर्जेदार शिक्षण मोफत दरात मिळेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी न समजलेला भाग युट्युबमार्फत समजून घेता येईल. ऑनलाइन माध्यमाचा वापर करताना कमीतकमी खर्चात अनेक स्पर्धा राबविणे शक्य होईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *