रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या अध्यक्षपदी अतुलसिंह परदेशी ; डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ.अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्विकारला पदभार

जुन्नर । पवन गाडेकर (निवासी संपादक, आपला आवाज)
दि.16 जुलै

                  रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा सन 2022/23 पदग्रहण समारंभ कार्यक्रम 16 जुलै रोजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ.अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या सन २०२२/२३ अध्यक्षपदाचा पदभार अतुलसिंह परदेशी यांनी स्विकारला तर सचिव पदाचा पदभार चेतन शहा यांनी स्विकारला.

                   डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल परमार असिस्टंट गव्हर्नर ॲड.संजय टेंभे रोटरीयन हेमा अनिल परमार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी २०२०/२१ चे अध्यक्ष हितेंद्र गांधी यांनी प्रास्ताविक करत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला व २०२०/२१ या रोटरी वर्षात केलेल्या कामाची माहीती देत वर्षभरात प्रोजेक्ट ला सहकार्य करणा-या क्लब मधील सदस्यांचा सत्कार केला.यावेळी रोटरीची २५ वर्षापेक्षा जास्त सेवा करणारे ज्येष्ठ रोटेरीयन जे.एल.वाबळे डाॅ.सुनिल शेवाळे यांचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ.अनिल परमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सन २०२२/२३ चे अध्यक्ष रोटेरीयन अतुलसिंह परदेशी यांनी रोटरी वर्षात सेक्रेटरी चेतन शहा आणि क्लब मधील सर्व सभासदांना सोबत घेऊन अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.यावेळी असिस्टंट गव्हर्नर ॲड. संजय टेंभे ज्येष्ठ रोटरीयन डाॅ.सुनिल शेवाळे यांनीही मनोगत व्यक्त करत नुतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.

                     रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे नुतन अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांच्या हस्ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ.अनिल परमार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब चे अध्यक्ष संतोष रासणे, मा.उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पापा खोत, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष कन्हैयालाल खोत, मा.नगरसेवक भाऊ कुंभार, मा.नगरसेवक शाम खोत, राजूशेठ लुणावत, पत्रकार नितिन गाजरे, राजेश डोके, उद्योजक सतिश कवडे, सुखदेव दुराफे, जयेश परदेशी, अभय साखला, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग मोढवे, ॲड.नंदकुमार चौधरी, जुन्नर भुषण अनिलकाका जोगळेकर, प्रदिप होगे, जितेंद्र बिडवई, लायन्स क्लब चे अध्यक्ष संतोष रासने, रोटरी क्लब आळेफाटा मेन चे अध्यक्ष संपत रहाणे, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे चे अध्यक्ष प्रा.श्रीकांत फुलसुंदर, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव मेन चे अध्यक्ष डॉ हनुमंत भोसले, मंचर रोटरी क्लब चे अध्यक्ष अदिनाथ थोरात, राजगुरूनगर क्लब च्या अध्यक्षा जयश्री पडवळ आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोटरीयन विलास कडलक यांनी केले तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ.अनिल परमार यांची ओळख रोटरीयन धनंजय राजुरकर यांनी करून दिली आभार रोटरीयन डाॅ.अमोल पुंडे यांनी मानले.

 

पुणे जिल्ह्य़ातील रोटरी क्लब मध्ये ज्या क्लब ची वेगळी ओळख आहे त्या शिवजन्मभूमी जुन्नर शहरातील रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या ,२०२२/२३ या वर्षाच्या अध्यक्षपदी रोटरीयन अतुलसिंह परदेशी आणि सेक्रेटरी चेतन शहा यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो.रोटरी वर्ष २०२२/२३ मध्ये नुतन कार्यकारिणीच्या हातुन समाज उपयोगी चांगली काम होतील असा मला विश्वास आहे असे मनोगत डाॅ.अनिल परमार यांनी व्यक्त केले…

नूतन कार्यकरणी पुढीलप्रमाणे:-
अतुल परदेशी (अध्यक्ष)
चेतन शहा (सचिव)
हितेंद्र गांधी (आयपीपी)
डॉ. अमोल पुंडे (प्रेसिडेंट इलेक्ट)
विजय कोल्हे (खजिनदार)
विनायक कर्पे (क्लब ट्रेनर)
तुषार लाहोरकर (आयटी ऑफिसर),
विनय वाबळे (फाऊंडेशन),
सचिन ताथेड (मेम्बरशीप),
मिलिंद घोडेकर (न्यु जनरेशन),
बाळासाहेब जाधव (पब्लिक इमेज),
धनंजय राजूरकर (सर्विस प्रोजेक्ट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *