आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत शुभम भंडारे व भाग्यश्री भंडारी विजेते ,पुणे जिल्हा क्रीडा विभागाला सांघिक विजेतेपद

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२९ डिसेंबर २०२१

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी.काळे महाविद्यालयातील क्रीडा विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत नाशिक विभागाच्या शुभम भंडारे व अहमदनगर विभागाची भाग्यश्री भंडारी यांनी वैयक्तिक विजेतेपद मिळविले. तर मुले व मुली या दोन्ही विभागात जनरल चॅम्पियनशीप पुणे जिल्हा विभागाने मिळविली.तसेच मुलांचे सांघिक विजेतेपद नाशिक तर मुलींचे अहमदनगर विभागाने मिळविले. स्पर्धेतील वैयक्तिक विजेते पुढील प्रमाणे- मुले – प्रथम क्रमांक – शुभम भंडारे (नाशिक), द्वितीय क्रमांक- सुनील निघोट (पुणे जिल्हा), तृतीय क्रमांक – दयाराम गायकवाड (नाशिक जिल्हा), मुली – प्रथम क्रमांक- भाग्यश्री भंडारी (अहमदनगर), द्वितीय क्रमांक – ऐश्वर्या खळदकर (पुणे जिल्हा), तृतीय क्रमांक – वृषाली उत्तेकर (पुणे शहर) यांनी मिळविले.

या स्पर्धेचे उद्घाटन घोडेगावचे पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेशशेठ काळे व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. संजय आर्विकर यांचे शुभहस्ते तर मुलींच्या स्पर्धेचे सरपंच क्रांती गाढवे व काळेवाडी – दरेकरवाडीच्या सरपंच मंजुषा बोऱ्हाडे यांचे शुभहस्ते स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.स्पर्धेसाठी या प्रसंगी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन श्री.अजित काळे,जनता विद्या मंदिरचे चेअरमन श्री.संतोष भास्कर, संचालक सोमनाथ काळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजू काळे, प्रशांत काळे, तसेच प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव, चारही विभागाचे संघ व्यवस्थापक, निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. भाऊसाहेब थोरात व स्पर्धा समन्वयक श्री.मनोहर कुंजीर यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *