श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान नळवणेची चैत्र पौर्णिमा यात्रा सलग दुसऱ्यांदा रद्द…

भाविकांनी घरीच तळी भंडार करून श्री स नैवेद्य अर्पण करून कुलाचार विधी करावा:- अध्यक्ष बाळासाहेब गगे

विभागीय संपादक रामदास सांगळे

बेल्हे दि.२४ (वार्ताहर):- नळवणे (ता.जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा याही वर्षी रद्द केली आहे.वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा यात्रा रद्द होत आहे.त्यामुळे गडावर भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे असणारी (दि.२७) एप्रिल रोजी ची कुलस्वामी खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा वाढत्या करोनामुळे सलग दुसऱ्यांदा रद्द केली आहे.
ह्या दिवशी फक्त पहाटे श्री मंगलस्नान व अभिषेक संपन्न होईल. इतर कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण घरातच तळी भंडार करून श्री स नैवेद्य अर्पण करून कुलाचार विधी करावा असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी केले आहे.
देशात महाराष्ट्रात करोना या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्या आदेशानुसार आपणही नाविलाजास्तव नळवणे गावचे श्रद्धास्थान, कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेरायाचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. सर्व भाविकांनी काळजी घ्यावी,शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.असे आवाहन देवस्थान ट्रस्ट ने भाविकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *