पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑगस्ट २०२२

पिंपरी 


जसे नवे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हाच आयुक्तांची बदली होणार याचे संकेत जाणकारांकडून देण्यात आले होते. त्याला कारणही तसेच होते आयुक्त राजेश पाटील हे कोणापुढे केव्हाच झुकले नाही. त्यामुळे नेहमीच सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे आणि त्यांचे काहींना काही कारणाने खटके उडत असे. आणि अखेर सरकार बदलले नवा गडी नवं राज्य प्रमाणे आयुक्त राजेश पाटील यांच्या तडकाफडकी च्या बदलाचे पत्र नवे आयुक्त शेखर सिंह यांना प्राप्त झाले. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी नियुक्ती झाली. पाटील प्रतिनियुक्तीने 5 वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. पाटील यांची महापालिकेतील अल्प कारकिर्द विविध कारणांनी वादग्रस्त ठरले होते.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश आज दि. 16 रोजी जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, शेखर सिंह शासनाने आपली नियुक्ती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त या पदावर राजेश पाटील (भाप्रसे) यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनात करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार राजेश पाटील यांच्याकडून त्वरित स्वीकारावा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *