कवींचे कॅलेंडर २०२२ चे उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते प्रकाशन

आपला आवाज न्यूज नेटवर्क*
०८ जानेवारी २०२१

पुणे 


भारतातील अभिनव कवितेत नाविण्य प्रयोग करणारी क्रियाशिल संस्था कवींचा आधारवड असणारे नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,पुणे ३९ वतीने भव्यदिव्य स्वरुपातील “कवींचे कॅलेंडर २०२२” चे प्रकाशन उद्योजक कोहीनूर ग्रुपचे चेअरमन व काॅसमाॅस बॅकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी श्री कृष्णकुमार गोयल म्हणाले,”कवींना हक्काचे व सन्मानाचे व्यासपीठ मिळुन देणारे काव्यमंच आहे.या कवींच्या कॅलेडरमध्ये संपूर्ण महाराष्टातील नामवंत कवी कवयिञींच्या एकुण ६० कवितांचा या कॅलेडर मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तारखेला त्यांचे वाढदिवस सुध्दा दिलेले आहेत.विविध संस्थेच्या उपक्रमाचे छायाचिञ देण्यात आले आहे.काव्यमेजवाणी यातुन रसिकांना देण्यात आलेली आहे.या कवींच्या कॅलेडरचे सर्वांनी जोरात स्वागत करावे.भविष्याची वाटचाल हि अशीच प्रगतीपथावर राहण्यासाठी संस्थेस माझ्या सदैव शुभेच्छा..!”

कवींच्या कॅलेडर २०२२ चे प्रकाशन कोहीनुर ग्रुप,पुणे च्या सेनापती बापट मार्ग कार्यालयात करण्यात आले. यावेळी कवी कॅलेडर २०२२ चे संस्थापक,संकल्पना,मांडणी करणारे कवी वादळकार यांनी आभार व्यक्त केले.हा कवी कॅलेडरचा यशस्वी प्रयोग करण्याचे तिसरे वर्ष आहे.

कवी वर्गासाठी भविष्यात अनेक उपक्रम घेण्यात येणार आहे. महाकाव्यसंमेलन,काव्यमैफल,काव्यसंग्रह प्रकाशन, कार्यशाळा, काव्यबैठका, काव्यसहली,इ.इ.सर्व उपक्रम महाराष्टभर विनामूल्य राबविले जातात. या कवींचे कॅलेडरचे सर्वञ कौतुक होत आहे. यापुर्वी ना.उपमुख्यमंञी अजितदादा पवार,मा.गृह,वृत्त राज्यमंञी दीपकजी केसरकर,पि.चि.पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश,उद्योजक सुनिलभाऊ नाथे,उद्योजक शंभूदादा पवार ,डाॅ.शांताराम कारंडे इ.अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष या उपक्रमाचे कौतुक केलेले आहे.तसेच अनेक रसिक,कवी कवयिञी व समाजातील प्रतिष्ठ मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्षञाचं देणं काव्यमंच गेली २२ वर्ष महाराष्टभर कवी वर्गासाठी कार्य करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *