राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
०८ जानेवारी २०२२

ओझर


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसळ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्र खराडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर केसनंद देतील जोगेश्वरी विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये पदवी व पदविका महाविद्यालयाच्या ५० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला आहे. आजादी का अमृत महोत्सव व माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत निवासी विद्यार्थ्यांना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुजित काकडे तुषार हुंबे यांचे मार्गदर्शन प्राप्त होत आहे. या शिबिराअंतर्गत कोविड जनजागृती, वृक्षारोपण व संवर्धन, दुग्ध व्यवसाय प्रोत्साहन, सेंद्रिय शेती प्रोत्साहन, पाणलोट क्षेत्र विकास, covid-19 लसीकरण मोहीम इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी गायत्री जमदादे व अभिजित फराटे यांनी दिली.

या शिबिरामध्ये दैनंदिन उपक्रमांतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अभियांत्रिकी महाविद्यालय मांजरी येथील व्याख्याते प्राध्यापक रवींद्र मोजे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला प्राधान्य क्रम देणे तसेच आपले अल्पकालीन व दीर्घकालीन ध्येय उद्दिष्टे ठरवून त्या अनुषंगाने उपलब्ध असणाऱ्या वेळेचे व्यवस्थापन करावे असे आवाहन प्राध्यापक रवींद्र मोजे यांनी केले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले ,पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य ऍड. सचिन कोतवाल, जोगेश्वरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता शिंदे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे माजी उपसचिव श्री विजय कोल्हे सर्व कार्यक्रम अधिकारी व शिक्षक बंधू उपस्थित होता.


 

One thought on “राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर संपन्न

  • January 8, 2022 at 1:20 pm
    Permalink

    अतिउत्तम उपक्रम शुभेच्छा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *