जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी पंचायत समिती व तहसिलदार कार्यालयात केलेल्या वेगवेगळया मागण्याची कार्यवाही होत नसल्याने दिव्यांग ञस्त…

प्रतिनिधी -कैलास बोडके

दिव्यांग बाधंवाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने दिव्यांग आयुक्तायलाची स्थापन करून या आयुक्तालयाच्या सुविधा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत पंचायत समितीकडे दिल्या जातात.
                जुन्नर पंचायत समितीकडे दिव्यांग बांधवांनी सुविधा मिळविण्यासाठी अर्ज करूनही अनेक दिव्यांगाना लाभ मिळाला नसल्याने दिव्यांग नाराज असुन या सर्व सुविधा मिळविण्यासाठी दि १५ फेब्रुवारी रोजी सर्व दिव्यांग पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी एस वाय माळी व तहसिलदार हणमंत कोळेकर यांना भेटून निवेदन दिले असल्याची माहीती प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास सोनवणे, मंगलताई गांजवे व महिद्र फापाळे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी अपंग सेलच्या जिल्हा अध्यक्षा पुष्पाताई गोसावी, निरगुडेचे सरपंच दिलीप शिंदे, तालुका अध्यक्ष गोविंद ढमाले,रोहिदास सोनवणे आदी मान्यंवर उपस्थित होते. यावेळी जुन्नर पंचायत समिती कार्यालयातील समाजकल्याण विभागात दुर्धर आजाराला मदत मिळावी म्हणुन अनेक दिव्यांगानी अर्ज केले आहे पण त्या वर कार्यवाही होत नाही कोविडच्या कालावधीत चार महिने प्रत्येक दिव्यांगाला एक हजार रूपये मिळणार होते ते सी ओ जिल्हापरिषद पुणे यांनी सांगितले होते ते मिळाले नाही, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च केला नाही, ग्रामपंचायती मध्ये किती निधी सर्व मार्गाने जमा झाला हे समजत नाही त्यासाठी सर्व ग्रामपंचायती नी दरवर्षी जमा होणारा निधी व खर्च होणारा निधी नागरिकाना कळण्यासाठी पतसंस्थे प्रमाणे जमा खर्चाचे पुस्तक छापण्याचे लेखी आदेश गटविकास अधिकार्‍यांनी सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवकांना दयावेत, अंत्योदय योजने अंतर्गत दिव्यांना रेशन मिळावे, रेशन देताना आधारकार्डच्या ठशाची समस्या निर्माण झाल्यास दिव्यांगाना सवलत देण्याचे आदेश तहसिलदार साहेबांनी पुरवठा विभागाला दयावेत, संजय गांधी निराधरा योजनेची माहीती दिव्यांग संघटनेला कळविण्यात यावी या व  इतर मागण्याचे निवेदन यावेळी देन्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *