शिक्रापूर ग्राम पंचायत मध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा : सरपंच रमेश गडदे

 विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्राम पंचायतच्या वतीने, ६३ व्या जागतीक दिव्यांग दिनानिमित्त भव्य कार्यशाळा व शासकीय योजनांची माहिती मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रमेश गडदे होते. यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुभाष खैरे, विद्यमान सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, पूजा भुजबळ, मोहिनी युवराज मांढरे, त्याचबरोबर ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे, नव्याने नियुक्ती झालेले भाजपा उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, त्याचबरोबर शिक्रापूर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, उपाध्यक्ष सुरेश टेमगिरे, सचिव अक्षय वाबळे, खजिनदार गोरक्ष कुंभार, सुरेश पाटील, वंदना रामगुडे, उमा शिंदे, मीरा धोंगडे, तसेच बहुसंख्येने दिव्यांग बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख कुंभार यांनी केले. सरपंच रमेश गडदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दिव्यांग बांधवाच्या विविध शासकीय योजनेची माहिती तसेच आपले अधिकार आणि कुठलाही दिव्यांग बांधव वंचित न राहता मागच्या काळात शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी स्मशानभूमी शेजारी अंत्यविधीचे एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळण्याचे दुकान चालू करून देण्यात आल्याचे सांगत, शिक्रापूर परिसरातील कुठल्याही दिव्यांग बांधवांवर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याची हमी देत, यापुढील काळातही दिव्यांग बांधवांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लघुउद्योग सुरू करण्याचे प्रोत्साहन देत, सर्वांना दिव्यांग दिनानिमित्त शुभेछ्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *