कल्याण-नगर महामार्गावर दुचाकीं व ट्रकचा अपघात । दुचाकीवरील दोघे जागीच ठार..

बेल्हे (वार्ताहर-विभागीय संपादक रामदास सांगळे)

कल्याण- अहमदनगर महामार्गावर गुंजाळवाडी या ठिकाणी मोटार सायकल व ट्रक च्या अपघातात मोटार सायकलवरील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. 
    याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण- अहमदनगर महामार्गावरील गुंजाळवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी अहमदनगर कडुन येत असलेल्या ट्रक (एम.एच.१२एफ.झेड ४०९७) ने समोरून येणा-या मोटार सायकल ला जोराची धडक दिल्याने मोटार सायकल वरील रघुनाथ मच्छिंद्र झांबाडे (वय ३०) व मिथुन बांदलदास (वय ६०) हे दोघेही (रा.शिरूर,जिल्हा पुणे) जागीच ठार झाले. या अपघातात दुचाकींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबतचा पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मधुकर पवार करत आहेत.