पारगावात अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

रामदास सांगळे
विभागीय संपादक

२९ नोव्हेबर २०२१

बेल्हे


पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. सप्ताहाच्या काळात अखंड विणा, पहाटे चार ते सहा काकडा, दुपारी तीन ते पाच नेमाचे भजन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री साडे सहा ते साडे आठ श्रीहरी किर्तन, रात्री नऊ ते दहा जागर हे दैनंदिक कार्यक्रम पार पडले.

श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताहाचे केले होते आयोजन

सकाळ व संध्याकाळी दानशुर अन्नदात्यांकडुन वारक-यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रविवार (दि.२८) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहाच्या काळात समस्त ग्रामस्थ पारगाव यांचे सहकार्य लाभले.पारगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन व प्रवचनाचा लाभ घेतला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *