जसे M फॉर मदर जी मुलाचे कधीच नुकसान होऊ देणार नाही तसे M फॉर मोदी देशाचे कधीच नुकसान होऊ देणार नाही – सुधीर मुनगुंटीवार

” अतिशय उत्तम प्रदर्शन आहे. दहा वर्षांमध्ये या देशामध्ये सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक,आर्थिक या चारही क्षेत्रामध्ये देशाने प्रगती बघितली आहे. जगामध्ये मोदीजींच्या कर्तुत्वाच्या कार्याने जो सन्मान भारताचा वाढला आणि संकल्प करून 5 ट्रिलियन डॉलर इकॉनोमी चा जो संकल्प आहे आणि त्या संकल्प साठी होणारा प्रयत्न आणि या प्रयत्नाची माहिती या प्रदर्शनातून माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पोहोचवण्याचे कार्य या प्रदर्शनातून केले आहे. ते अभिनंदनीय आहे कौतुकास्पद आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार ही मानतो आणि धन्यवाद ही देतो. एक न्यू इंडियाचा संकल्प घेऊन माननीय मोदीजी काम करत आहे. आणि हे खरं आहे जसे M for Mother ती आई आपल्या मुलाचे कधीच नुकसान होऊन देत नाही तसेच M for मोदीजी  आपल्या देशाचे कधीच नुकसान होऊ देणार नाही आणि यासाठी सर्वसामान्य लोकांनी आपल्या शुभकामना सदिच्छा द्याव्या, वडीलधाऱ्यांनी मोदीजींना आशीर्वाद द्यावा समवयस्करांनी सदिच्छा द्यावी आणि वयाने कमी असणाऱ्यांनी मोदी जी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है हा संकल्प करावा हीच या प्रदर्शनाच्या मागची खरी भूमिका आहे त्या भूमिकेला मी समर्थनही देतो आणि शुभकामना देतो”
नवं वर्ष नमो वर्ष २०२४
निमित्त औद्योगीक नगरी पिंपरी चिंचवड मध्ये कलारंग सांस्कृतीक कलासंस्थाचे वतीन आपला आदर्श … आपली प्रेरणा नवं भारत निर्माण संकल्पक भारताचे माननीय पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकिर्दीवर आधारीत ‘ पंतप्रधान ते प्रधानसेवक ‘ .नरेंन्द्र मोदी प्रदर्शन खुप सुंदर आयोजन केले होते, त्या प्रदर्शनाला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भेट दिली व तब्बल एक तास हे प्रदर्शन पाहिले, कलारंग संस्थेचे अध्यक्ष व मुख्य संयोजक अमित गोरखे व ज्यांनी १० वर्ष प्रत्येक बातमी संकलीत केली ते संयोजक  नितीन चिलवंत यांचे माननीय सांस्कृतिक मंत्री सुधीर मूनगंटीवर यांनी कौतुकास्पर आभार मानले.
आमदार उमाताई खापरे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप , सदाशिव खाडे, माऊली थोरात,  कैलास कुटे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे, गणेश लंगोटे, मनीषा शिंदे,  निलेश अष्टेकर , राजू बाबर,मदन गोयल, उपस्थित होते व मोठ्या संख्येने नागरिक प्रदर्शनाला भेटीसाठी आले होते.
अमित गोरखे यांनी स्वागत केले तर शिवकुमार बैस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *