साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये – अजित पवार

१४ डिसेंबर २०२२


फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. या पुरस्काराची निवड समितीही रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून स्थापन करण्यात आलेली निरीक्षण समिती काही कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, साहित्य क्षेत्रात आम्ही कधीही हस्तक्षेप केला नाही. पुरस्कार रद्द करण्याच्या निर्णयाचे सरकार लंगडं समर्थन करतंय. साहित्य क्षेत्रात सरकारचे हस्तक्षेप करणं हे निषेधार्ह आहे. नवीन समस्या निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ६ दिवसांत पडद्यामागे काहीतरी घडलं आणि पुरस्कार रद्द झाला. साहित्य क्षेत्रात राजकीय ढवळाढवळ करु नये. असा शिंदे – फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *