
बेल्हे दि.१४ (विभागीय संपादक रामदास सांगळे):-
महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज राजुरी (ता.जुन्नर) येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आयटीआय या नवीन अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असल्याची माहिती प्राचार्य भागवत रांधवन यांनी दिली.
सह्याद्री व्हॅली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्य व केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून यामध्ये फिटर,वेल्डर,इलेट्रेशियन ,कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स या कोर्सेस ला मान्यता मिळाली असल्याने प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया कडून मान्यता मिळाली आहे तसेच केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ स्कील डेव्हलपपेमेंट तर्फे ही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. फिटर,वेल्डर,इलेट्रेशियन या कोर्सला प्रत्येकी २० विद्यार्थी तर कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स कोर्सला २४ विदयार्थी क्षमता मंजूर झाली आहे.त्यामुळे मर्यादित प्रवेश असणार आहेत.या मुळे आता ग्रामीण भागातील मुलांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.