खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या काही तासातच आवळल्या मुसक्या-पुणे ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२3 नोव्हेंबर २०२१

पुणे


पुणे ग्रामीण पोलीस दलाने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या ८ तासात मुसक्या अवळल्या आहेत.दि. २१नोव्हेंबर रोजी फिर्यादी पांडुरंग मारुती बंडेवाड (वय 28 वर्षे) रा. टिळक नगर कात्रज पुणे यांनी फिर्याद दिली आहे. त्याच दिवशी सकाळी ९:३० च्या सुमारास मौजे बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे वन विभागाचे जमिनीत माझा तृतीयपंथी लहान भाऊ मगरध्वज मारुती बंडेवाड, (वय 26 वर्षे), रा.कोळवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर सध्या रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे याचा खून झाला असून त्याचे डोक्यातुन व तोंडातून रक्तस्त्राव होत आहे अशी फिर्याद यवत पोलीस स्टेशन मध्ये दिल्यानंतर विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने सदर खुनाच्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन संयुक्त तपास सुरू करून माहिती संकलित करून थेऊर फाटा ते सहजपुर फाटा पर्यंत चे सि सि टीव्ही फुटेज चेक केले. सदर सि सि टीव्ही फुटेज मध्ये मयत मगरध्वज बंडेवाड याचे सोबत आणखीन एक जण असलेचे दिसून येत होते. पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयता सोबत त्याचा सहकारी काजल चव्हाण असल्याची माहिती काढून त्यास थेऊर येथून चौकशी कामी ताब्यात घेतल्या नंतर चौकशी केली असता काजल चव्हाण याने सुरवातीला उडवा – उडवीची उत्तरे दिली परंतु पोलीस पथकाने त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता सदरचा खून काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण, (वय 26 वर्षे) , रा. रुई धानोरा, ता. गेवराई , जि. बीड सध्या रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे यानेच केल्याचे उघडकीस आले आहे.सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, स्वप्नील लोखंडे, सचिन काळे, संदीप येळे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, गणेश करचे, राजीव शिंदे, संदीप देवकर, महेंद्र चांदणे,रामदास जगताप, मेघराज जगताप, निखिल रणदिव, सोमनाथ सुपेकर,मारुती बाराते, किरण तुपे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *