जास्तीत जास्त सी ए घडावे यासाठी प्रयत्न करणार. मोफत प्रशिक्षण राबविणार-सीए मनीष गादिया…

प्रसन्ना तरडे
पिंपरी वार्ताहार

पिंपरी:- दि १३ ऑगस्ट २०२१ आयसीएआयच्या वतीने कॉमर्सच्या विद्यार्थ्यांमधील सीए बद्दलची भीती कमी व्हावी, आणि त्यांना सीए बनण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने महाविद्यालयीन स्तरावर मोफत ३६ तासांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यातून जास्तीत जास्त सीए घडतील. असा विश्वास आयसीएआय च्या वेस्टर्न रीजनचे अध्यक्ष सीए मनिष गादीया यांनी व्यक्त केला .

निगडी येथील दि इंस्टीट्यूटऑफ़ चार्टर्ड अकाउन्टन्ट ऑफ़ इंडिया ( आयसीएआय)च्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ज्येष्ठ सनदी लेखपानांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आयसीएआय च्या वेस्टर्न रीजनचे उपाध्यक्ष
सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, सीए विद्यार्थी संघटना(विकासा) अध्यक्ष सीए यशवंत कासार, केंद्रीय परिषदेचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, प्रादेशिक परिषद सदस्य सीए उमेश शर्मा, पुणे शाखेचे सीए अभिषेक धामणे , सीए अमृता कुलकर्णी ,सदस्य, सीए राजेश अग्रवाल
, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष चंद्रकांत काळे , उपाध्यक्ष सीए विजयकुमार बामणे ,सचिव तथा कोषाध्यक्ष सीए शैलेश बोऱे,माजी अध्यक्षा सीए सिमरन लिलवानी, सीए संतोष संचेती, सीए पंकज पाटणी, सीए सचिन बंसल, संतोष संचेती,बबन डांगले, प्रसाद सराफ, मनोज आगरवाल आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ सनदी लेखापाल रवी राजापूरकर,किशोर गुजर, प्रवीण पोकर्णा,डॉ अशोककुमार पगारिया,नंदकिशोर तोष्णीवाल, रवींद्र खाडिलकर, धरमवीर चड्डा, चंद्रकुमार छाब्रा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सीए गादीया पुढे ते म्हणाले कि, या कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना संगणक,व्यक्तिमत्त्व विकास,संभाषण कला, कर व जमा खर्चाची माहिती या विषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी सीए चितळे म्हणाले कि, आयसीए आय ने ‘आर्थिक व कर साक्षरता’ हे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये छोटे व्यापारी, करदाते, पेंशनर,विद्यार्थी, कामगार,महिला यांना सामावून घेतले जाईल. या संदर्भातील सर्व माहिती ९ प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या भोइटे यांनी तर व आभार शैलेश बोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *