नारायणगाव बाह्यवळण खोडद चौकात लवकरच भुयारी मार्ग

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१ डिसेंबर २०२१

नारायणगाव


नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या नारायणगाव खोडद व पाटे खैरे मळा रस्त्यावरील चौकामध्ये भुयारी मार्गाच्या वेगवान पूर्ततेसाठी तातडीने बैठक आयोजित करण्याचे सुतोवाच केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असल्याची माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या येथील बाह्यवळण रस्त्यावर नारायणगाव खोडद चौकात नुकताच अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे हा रस्ता संतप्त ग्रामस्थांकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर नारायणगाव पोलिस ठाण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, अवधूत खरमाळे, सरपंच सविता गायकवाड, सोमनाथ सोनवणे तसेच हिवरे व खोडद येथील ग्रामस्थ वाहतुकीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये वाहतुकीबाबत तसेच भुयारी मार्गाबाबत चर्चा करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सूतोवाच

या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिल्ली येथे भेट घेतली. याविषयी खासदार कोल्हे म्हणाले की, खोडद व पाटे खैरे मळा चौक या दोन्ही ठिकाणी अंडरपास म्हणजेच भुयारी मार्गाच्या कामाला तातडीने मंजुरी मिळावी तसेच शिवनेरी गडावर रोपवे बांधणे, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या मोशी ते चांडोली रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे याविषयी मंत्री केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा झाली या कामांसाठी त्वरित बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी स्वीय सचिव तथा आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांना दिले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *