चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर

१४ डिसेंबर २०२२

पिंपरी


पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तीन जणांना पुण्याच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली होती. यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. गेल्या शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडेनं पिंपरीमध्ये शाईफेक केली होती. या प्रकरणी मनोजसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. शाईफेक करणाऱ्या तिघांवर ३०७ कलमासह इतर कलमं लावण्यात आली होती. विरोधकांनी भाजपावर टीका केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ३०७ हे कलम काल मंगळावारी मागे घेतलं होतं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *