पोलिस नाईक ते पोलिस हवालदार पदी पदोन्नती

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२३ नोव्हेंबर २०२१

ओतुर


ओतुर(ता. जुन्नर ) येथील पोलिस स्टेशन मध्ये पोलिस पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली आहे. गेले पाच वर्ष या सर्वांनी प्रमाणिकपणे ओतूर पोलिस स्टेशनमध्ये कामकाज पाहिले आहे.पुणे ग्रामिण पोलिसदलाचे पोलिस आधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशाने तसेच सेवा जेष्ठ तेनुसार पोलिस नाईक ते पोलिस हवालदार पदी पदोन्नोती नरेंद्र गोऱ्हाने आणि मुकुंद मोरे यांना मिळाली आहे.

पोलिस नाईक ते पोलिस हवालदार पदी पदोन्नती

ओतुर पोलिस स्टेशचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे तसेच पोलिस उपनिरिक्षक आकाश शेळके यांच्या हस्ते दोघांच्या खांद्यावर फीत लावून पदोन्नोती ग्रहण करण्यात आली आहे . या दोघांचीही पोलीस हवालदार पदी पदोन्नती करण्यात आली असून सोशल मीडिया च्या विविध माध्यमातून त्यांचे कौतुक केले जात आहे. या वेळी ओतूर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *