जागतिक पुरुष दिन अनोख्या पद्धतीने महानगरीत साजरा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२० नोव्हेंबर २०२१

पिंपरी चिंचवड


पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश व महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि उपस्थितांची जिंकली मने

१९ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने आपला आवाज न्यूज नेटवर्क तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ‘द मिरर मॅन’ हा पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ‘द मिरर मॅन’ हा पुरस्कार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विश्वासराव आरोटे, आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांचा हस्ते सामाजिक उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रसिद्ध गायीका कार्तिकी गायकवाड यांच्यासह विभागीय संपादक रोहित खर्गे, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, कार्यकारी संपादक किरण वाजगे, निवासी संपादक पवन गाडेकर, व्यवस्थापक लक्ष्मण दातखिळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी उज्वला शेवाळे……।। तसेच उपस्थित पुरस्कार्थी मान्यवर उपस्थित होते ….

आपला आवाज न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे आयोजन

द मिरर मॅन’ पुरस्कार प्राप्त मान्यवरांना फेटा बांधून औक्षण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप पाटील यांनी करून आपल्या गोड आवाजाने उपस्थित प्रेक्षकांची मने
जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी केले.या कार्यक्रमात पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश पालिका आयुक्त राजेश पाटील यांना प्रक्ष विचारात छोटेखाणी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते यात पौरुषत्व महिला व पुरुषांचे आपापसात असणारे संबंध या विषयी असणारे नाते पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केले.पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहर देशात क्रमांक एकचे शहर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले यासाठी समाज माध्यमांसह सर्वांचाच सहभाग यामध्ये महत्त्वाचा असल्याचे सांगितले तर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.

प्रास्ताविकामध्ये आपला आवाज चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी अल्पावधित मध्ये पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुरू केलेल्या आपला आवाज न्यूज नेटवर्क द्वारे वार्तांकन याबरोबरच विविध सामाजिक कार्यक्रम साजरे करण्यामागची भूमिका स्पष्ट केली तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरुष दिन साजरा होत असताना पुरुषांवर असणारी जबाबदारी स्पष्ट केली. इंटरनॅशनल मेन्स डे निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते केक कापून सेलेब्रेशन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांनी परिश्रम घेत इव्हेंट मॅनेजमेंट चे काम चोख पार पाडले. यावेळी ज्या मान्यवरांनी ‘द मिरर मॅन’ हा पुरस्कार प्राप्त झाला त्यात पंडित कल्याणजी गायकवाड माजी सैनिक रमेश खरमाळे न्यू श्री ज्वेलर्स चे संचालक प्रतिक जवळेकर यांनी आपले सत्कारपर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते आपला आवाज आपली सखी तर रेडीओ पार्टनर होते FM 91.1 रेडीओ सीटी होते.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *