भक्ती शक्ती परिसर 15 हजार दिव्यांनी उजळून निघाले- दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रतिष्ठनचा उपक्रम

भानुदास हिवराळे
बातमी प्रतिनिधी
५ नोव्हेंबर २०२१

निगडी


दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रीतिष्ठान च्या वतीने भक्ती शक्ती येथील जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्प निगडी या ठिकाणी दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्या संकल्पनेतून उभे केले. त्या ठिकाणी आज प्रतिष्ठनचा वतीने १५ हजार दिवे लावून दीपोत्सव करण्यात आला व सगळा परिसर उजळून निघाला.

दीपमहोत्सवाचे हे २० वे वर्ष असून याठिकाणी प्रत्येकवर्षी हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे यांनी सांगितले. कोरोनामुळे मागील एक वर्ष खंडित झाल्याचेही आपला आवाजकडे बोलताना सांगितले.

चिंचवड विधानसभा चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. व उपस्थित नागरिकांनी क्षणात सगळ्या परिसरात दीप लावून सगळा परिसर उजळून निघाला.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे , जेष्ठ नगरसेविका सुमनताई पवळे, क्रीडा, साहित्य सांस्कृतिक सभापती प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक रवी लांडगे, अमित गावडे, नगरसेविका अश्विनीताई बोबडे, कमलताई घोलप, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, आप्पा बागल, कान्हे चे सरपंच विजय सातकर, राष्ट्रवादी विद्यार्थी पिंपरी चिंचवड सेल चे अध्यक्ष यश दत्ता साने, तानाजी काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

उप्रकम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचे सुमनताई पवळे यांनी सांगितले.

bhakti shakti monument in the evening
संध्याकाळी भक्ती शक्ती स्मारक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *