पिंपरीत युवक काँग्रेसकडून पंजाब निकालांचा जल्लोष…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि. १८ फेब्रुवारी २०२१
पंजाब राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणूकांत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या प्रचंड व भव्य विजयाचा जल्लोष आज पिंपरी चौकात युवक काँग्रेस कार्यकर्त्यां कडून करण्यात आला.

पिंपरी चौकात मिठाई वाटून, फटाके वाजवून व काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
सत्यमेव जयते! पंजाब तो सिर्फ झाँकी है पूरा देश अभी बाकी है! काँग्रेस पक्षाचा विजय असो! अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“पंजाब मध्ये सात पैकी सहा महानगरपालिका काँग्रेस ने जिंकल्या आहेत व नगरपालिकेतही मोठा विजय प्राप्त करत काँग्रेसने १८१७ पैकी ११०२ जागांवर विजय
मिळवत भाजपाचा दमदार पराभव केला आहे हा पराभव नरेंद्र मोदींचा व भाजपाच्या अंहकारी सरकार चा आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्ली सीमेवर व देशभर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाबाबत जाणीवपुर्वक डोळेझाक, महागाई, इंधन दरवाढ, सत्तेचा गैरवापर, हुकूमशाही मनमानी वृत्ती, भांडवालदारांची गुलामी, अत्याचार, जातीयवाद, ढोंगीपणा करत असलेल्या व विश्वासघाती असलेल्या भाजपाला पंजाब मधील नागरिकांनी संपूर्ण पणे नाकारले आहे हा विजय जनशक्तीचा व भारतीय लोकशाही चा आहे सोनियांजींचा आहे राहूल जीं चा आहे, असे बनसोडे म्हणाले.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे, युवक काँग्रेस चे पदाधिकारी पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, शहर सरचिटणीस अशोक लाड, अपूर्वा इंगवले, अनिल सोनकांबळे, मिलिंद बनसोडे, अर्णव कामठे, सुधीर सांळूखे, अमित जगदाळे,मयुर तिखे, प्रविण जाधव, राकेश संपागे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *