कंत्राटी पद्धतीने सफाई कामे करणाऱ्या महिलांचे थाळीनंद आंदोलन

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी- दि ३ नोव्हेंम्बर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत साफसफाईचे कंत्राटी पद्धतीने १६०० ( सोळाशे) महिला कामे करत आहेत, त्यांचे अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित असून विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतूत्व खाली साफ सफाई कामगार महिला पुरुषांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर थाळीनंद आंदोलन केले,
रिपब्लिकन युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, अजय लोंढे, भारत मिरपगारे , .भिम कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साळवे यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला.

या वेळी , बळीराम काकडे , प्रल्हाद कांबळे ,मधुरा डांगे,
कांताबाई कांबळे,संगीता जानराव ,मंगल तायडे ,सविता लोंढे ,प्रमिला गजभारे ,अरुणा पवार ,रुक्मिणी कांबळे
,जयश्री धोत्रे,आशा पठारे, उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले आज ही सणा सुदीच्या काळात थाळीनाद आंदोलन करून हे निवेदन देण्यात आले , सणासुदीच्या काळात थाळी बडविण्यास लावणे, हा आपल्या प्रशासनाचा नाकर्तेपणा असून प्रशासनाच्या या लहरी कारभार मुळे सफाई कामगारांचे जगणे मुस्किल झाले आहे , विविध मागण्यांसाठी सफाई कामगार महिलांनी ,आंदोलन सुरू केले आहे , मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे या वेळी म्हणाले.

१)गेल्या वीस वर्षापासून साफ सफाई कामगार महिला पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने साफ सफाईची कामे करत आहेत त्या सर्व महिलांना कायम सेवेत घेण्यात यावे.

२) कामगार कायदा नियमा नुसार दिवाळी निमित्त पगारा एवढा बोनस मिळाला पाहिजे.

३)कोरोना आपत्ती काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिल्या बद्दल पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळावी.

४)थकीत प्रा.फंड महिलांच्या नावावर मिळावा आणि सर्व महिलांना प्रा.फंड आणि इ.एस.आय या सुविधा मिळाल्या पाहिजे.

५) घरकुल योजनेत प्राधान्य देऊन साफ सफाई कामगार महिलांना घरकुल मिळाले पाहिजे.

६) किमान समान वेतनाचा मागील फरक मिळालाच पाहिजे
७) मुलांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे.

८)साफ सफाई कामगार महिला काम करत असलेल्या ठिकाणी डबे ठेवण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था झालीच पाहिजे.

या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले , अशी माहिती कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *