बेल्हेच्या युवक राष्ट्रवादी कार्यअध्यक्षावर प्राणघातक हल्ला: तिघांवर आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल: आरोपींना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२० नोव्हेंबर २०२१

बेल्हे


गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे कल्याण-अहमदनगर महामार्गावरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारुन जखमी केल्याप्रकरणी तिघाजणांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी बेल्हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे (रा.बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे) हे शुक्रवारी (दि.१९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथून आपल्या दुचाकीवरुन बेल्हे गावाकडे जात असताना राजुरी गावच्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागून येणारे त्यांचे चुलतभाऊ साहेबराव चाटे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

या प्रकरणी साहेबराव धनंजय चाटे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कल्याण-अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या एका मंगल कार्यालयासमोर गुंजाळवाडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत घडली. हा हल्ला जमिनीच्या वादातून झाला असायची चर्चा आहे.पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्हे पोस्ट चे पीएसआय पवार करत आहेत.चाटे यांचावर हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *