महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ ऑक्टोबर २०२१

मुंबई


आजच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावरील नियुक्तीची राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती. त्यांनी या संधीचे सोने करत सुरुवातीलाच डॉक्टर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या गेलेल्या शिवस्वराज्य यात्रेत अतिशय आक्रमकतेणे विरोधकांवर हल्ले चढवत आपली भाषणे गाजवली. त्यानंतर नेहमीच त्या आक्रमक राहिल्या . प्रसंगी अनेक वेळा चित्रा वाघ व रूपाली चाकणकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. जेव्हा रुपाली चाकणकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले, तेव्हाही चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर हल्ला चढवला . त्यावेळी चाकणकर यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आता काय प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *