पिं.चिं. महापालिकेच्या पाच विषय समित्यांमध्ये शेवटच्या वर्षी ‘यांची’ लागली वर्णी; सर्वसाधारण सभेत निवड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ ऑक्टोबर २०२१

पिंपरी


महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला- साहित्य व सांस्कृतिक समितीत आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची बुधवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. या पाचही समित्यांमध्ये नऊ सदस्य असून पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समिती निवड झाली. यांची निवड बंद पाकिटातून भाजप पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी गटनेते राहुल मिसाळ यांनी आपापल्या सदस्यांची नावे पाठवली ती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी वाचून दाखवली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी २० ऑक्टोबर रोजी झाली. महापौर उषा उर्फ माई ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत विषय समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.

विषय समिती आणि पक्षनिहाय निवड झालेले सदस्य –

विधी समिती : –
भाजपा – संगीता भोंडवे, सुनीता तापकीर, स्वीनल म्हेत्रे, कोमल मेवानी, वसंत बोराटे
राष्ट्रवादी काँग्रेस-संगीता ताम्हाणे, गीता मंचरकर, विक्रांत लांडे
शिवसेना-अमित गावडे

महिला व बालकल्याण समिती :-
भाजप – योगिता नागरगोजे, सविता खुळे, उषा मुंडे, जयश्री गावडे, निर्मला गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेस- स्वाती काटे, अनुराधा गोफणे, सुमन पवळे
शिवसेना – रेखा दर्शिले

शहर सुधारणा समिती :-
भाजप – आरती चोंदे, बाळासाहेब ओव्हाळ, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे,साधना मळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस – वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, समीर मासुळकर
शिवसेना – सचिन भोसले

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती :-
भाजप – नीता पाडाळे, शारदा सोनवणे, उत्तम केंदळे, शर्मिला बाबर,अश्विनी जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस – अपर्णा डोके, डब्बू आसवानी, राजू मिसाळ
शिवसेना – रेखा दर्शिले

शिक्षण समिती :-
भाजप – माधवी राजापूरे, सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनीषा पवार, शैलेश मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस -प्रज्ञा खानोलकर, संजय वाबळे भाऊसाहेब भोईर
शिवसेना – अश्विनी वाघमारे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *