ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी तन्मय काळभोर आणि सायली गोसावीची निवड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

सातारा शेंद्रे येथे २६ ते २८ ऑक्टोबर होणा-या ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाकडून १३० किलो गटात तन्मय काळभोर (आकुर्डी) आणि ७६ किलो (महिला) गटात सायली गोसावी यांची निवड करण्यात आली.

रहाटणी येथे शनिवारी (दि. १६ ऑक्टोबर) ग्रिको रोमण स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेच्या आखाड्याचे पुजन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे आणि माजी नगरसेवक कैलास थोपटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. महिला कुस्ती स्पर्धेचे उद्‌घाटन नगरसेविका सविता खुळे यांच्या हस्ते करण्यात आले. पै. दिलीप बालवडकर, पै. भारत श्री विजय गावडे, पै. संतोष माचुत्रे, पै. धोडिंबा लांडगे, पै. काळूराम कवितके, पै. दिलीप आप्पा काळे, पै. विशाल आप्पा कलाटे, पै. माऊली कुटे, पै. भानुदास काटे, पै. किशोर नखाते, पै. अजय लांडगे, पै. निवृत्ती काळभोर, पै. विजय नखाते, पै. शाम बालवडकर, पै. सुरेश वाळुंज, पै. संभाजी लांडगे, पै. पप्पू काळभोर, पै. नवनाथ नढे, पै. बबन बो-हाडे, पै. पंडीत मोकाशी, पै. अभिषेक फुगे, पंच रोहिदास आमले, बाळासाहेब काळजे, विजय कुटे आदी उपस्थित होते.

सातारा येथे होणा-या ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडची निवड चाचणी संपन्न

पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ ग्रिको रोमन निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २६ ते २८ ऑक्टोबर शेंद्रे सातारा येथे होणार.स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे : मुलांचा गट : ५५ किलो विजयी किरण माने (आकुर्डी) विरुध्द दिक्षांत रणधीर (चिंचवड) ; ६० किलो विजयी प्रणव सस्ते (मोशी) विरुध्द स्वप्निल पवार (एच.ए.तालीम) ;६३ किलो विजयी हर्षद पालवे (वाकड) विरुध्द राज बालवडकर (पिंपळे निलख) ; ६७ किलो विजयी महेंद्र बनकर (काळेवाडी) विरुध्द वैभव बारणे (थेरगाव) ; ७२ किलो विजयी विशाल कोळी (दिघी) विरुध्द शिव ओम थोरात (भोसरी) ; ७७ किलो विजयी अनिकेत लांडे (भोसरी) विरुध्द सोहम लोंढे (भोसरी) ;८२ किलो विजयी यश थोरवे (च-होली) विरुध्द पवन चव्हाण (भोसरी) ; ८७ किलो विजयी अभिषेक फुगे (फुगेवाडी) विरुध्द मोहन कोकाटे (रहाटणी) ; ९७ किलो विजयी विशाल हरगुडे (पिंपरी) विरुध्द रोहन बारणे (थेरगाव) ; १३० किलो विजयी तन्मय काळभोर (आकुर्डी) ;महिला गट : ५० किलो स्नेहल बारवकर (चिखली) ;५३ किलो सारीका सोनवणे (ताथवडे) ; ५५ किलो श्रृती मारणे (भोसरी) ; ५७ किलो सारीका माळी (आकुर्डी) ; ६८ किलो सोनी दुपाली (रहाटणी) ; ७२ किलो प्रियांका बोकेफोडे (थेरगाव) ; ७६ किलो सायली गोसावी (निगडी) यांची निवड करण्यात आली. अशी माहिती संतोष माचुत्रे यांनी दिली.

Selection of Tanmay Kalbhor and Saily Gosavi for Greco Roman Wrestling Championship
ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी तन्मय काळभोर आणि सायली गोसावीची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *