रोहित खर्गे
विभागीय संपादक
०६ फेब्रुवारी २०२२
मुंबई
भारताच्या स्वर गायिका लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात २८ दिवसांच्या प्रदीर्घ मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज रविवारी (दि ६फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून १२ मिनिटाने दुःखद निधन झाले.
लतादीदींनी शेकडो गाणी गायली.
लतादीदीचे शेकडो चाहते आज शोकसागरात बुडाले. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली इंदूर मध्ये झाला. आई शेवंताबाई आणि वडील हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे मिळाले. संगीत नाटकांपासून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. किती हसाल या चित्रपटाला त्यांनी पाहिले गीत गायले. २२ भाषांमधून त्यांनी ५० हजार गाणी गायली. सर्वात जास्त गाणी गायलेल्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली. आनंदघन गाण्याला संगीत दिले. १९४६ साली त्यांचे पहिले हिंदी गाणं ध्वनिमुद्रित केलं.
केंद्र सरकारडून दोन दिवसांचा दुखवटा जाहीर. कला सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली.
दुपारी साडेबारा वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणणार आहेत. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी ६.३० वाजता शासकीय इतमानात अंत्यसंकार करण्यात येणार आहे.
लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली- नितीन गडकरी.
कानांना अतृप्त करणारे स्वर हरवले शरद पवार यांचे ट्विट. मेरी आवाज ही मेरी पहचान है त्यांचा आवाज आम्ही कसा विसरू शकतो. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले. त्यांचा आवाज आम्ही कसा विसरू शकतो आशा शब्दात सिनेस्टार अक्षय कुमार यांनी त्यांना शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली. लतादीदी कायम आपल्या सोबत आहेत देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट .लता मंगेशकर देशाचा अभिमान, लतादीदींच्या जाण्याने अतीव दुःख झाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद. अशी गानकोकिळा पुन्हा होणे नाही उपमुख्यमंत्री अजित पवार.
संगीत विश्वातील तारा हरपला संगीत क्षेत्रातील एका पर्वाचा अंत लतादीदींच्या जाण्याने मोठे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटभारताचा आवाज हरपला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. लता मंगेशकर अमर आहेत खासदार संजय राऊत यांचे ट्विट. जगातील अलौकिक सूर हरपला ज्येष्ठ संगीतकार रवींद्र साठे लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या पण त्या आपल्यात आठवणीने आहेत- ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते सुरू झाले ते आजतागायत ठाकरे कुटुंबीयांशी जोडले गेले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली.
आई शेवंताबाई यांच्याकडून गाण्याचे धडे लहानपणी मिळाले. १९५७ मध्ये पहिला फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. त्यानंतर त्यांच्यावर पुरस्कारांची जनू बरसात झाली. १९६९ पद्मभूषण पुरस्कार १९९१ साली दादासाहेब फाळके पुरस्कार १९९१ साली गिनिज बुक रेकॉर्ड १९९९ पद्मविभूषण पुरस्कार २००१ मध्ये भारतरत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले.
त्यांचे ये मेरे वतन के लोगो हे गीत अजरामर झाले. तसे कौतुक भारताचे पंतप्रधान जवाहरला नेहरू यांनी केले होते.
अशा या महान स्वरगायिकेस आपला आवाज न्यूज नेटवर्क, आपला आवाज आपली सखी,
आवाज A to Z परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली.