प्रदेक्षाध्यक्षा समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ ऑक्टोबर २०२१

पिंपरी


लवकरच शहरात येऊ असा विश्वास दिला

काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज सोमवारी मुंबई येथील निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी भेट घेतली. डॅा.कैलास कदम यांच्या काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवडीबाबत शाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले व पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

या वेळी पक्ष संघटनात्मक बांधणी व आगामी कामकाजाबाबत पटोले यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, चर्चेत नाना पटोले यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकी बाबत मार्गदर्शक सूचना दिल्या व शहरात काँग्रेस संघटना वाढीच्या ठळक बाबी व विशेष तंत्रे समजावून सांगितली व शहरात येऊन बैठक घेण्याबाबतची पदाधिका-यांची विनंती मान्य करत लवकरच शहरात येऊ असा विश्वास दिला.

या प्रसंगी कैलास कदम यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकीत उत्तम यश मिळविण्याबाबत ची तयारी व नियोजन याबाबत पटोले यांनी माहीती दिली.

या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अमित मेश्राम व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.

प्रदेक्षाध्यक्षा समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *