जनसेवेच्या विविध उपक्रमांमधून पिंपरी चिंचवड शहरात साजरा होतोय मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस…

युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड युवा सेनेच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- १३ जून २०२१
युवासेनाप्रमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने आदित्य जनसेवा सप्ताह आयोजित केला आहे. या अंतर्गत गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, रिक्षाचालकांना कोरोना सुरक्षा कव्हर वाटप, पवना नदी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. 7 तारखेपासून या आदित्य सप्ताहाला सुरुवात झाली. जनसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात साजरा होत आहे.

याबाबतची माहिती देताना विश्वजित बारणे म्हणाले, युवासेनाप्रमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आदित्यसाहेब पर्यावरणमंत्री आहेत. त्यामुळे वृक्षारोपण, पवना नदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोरोना काळात अनेक गोरगरीब नागरिकांचे हाल झाले आहेत. या नागरीकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सुमारे 1 हजार नागरिकांपर्यंत अन्नधान्याची किट पोहोचवले आहे. या माध्यमातून संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे काम युवा सेनेने केले आहे.

Advertise

विश्वजित बारणे पुढे म्हणाले, गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य कीट वाटप करून 7 जूनपासून आदित्य जनसेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मोरेश्वर कॉलनी, थेरगांव येथे अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवासेना पदाधिकारी अक्षय परदेशी, महेश गेजगे, गणेश थोरात उपस्थित होते.

8 जून रोजी थेरगांव येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक निलेश बारणे, युवासेना पदाधिकारी अक्षय परदेशी, महेश गेजगे, गणेश थोरात, स्वप्निल सुतार, विक्रम झेंडे, प्रशांत नखाते, आदित्य किरवे, अक्षय काकरे, विजय शिंदे, सुरज बारणे, इश्वर कुमावत उपस्थित होते.

9 जून रोजी थेरगांव येथील कन्हैया पार्क, 16 नंबर येथे अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी युवासेना पदाधिकारी संदीप येळवंडे, सचिन झरेकर, प्रशांत करडे, करण आहेर, संग्राम पवार, प्रज्वल हवाले, विक्रम झेंडे, आकाश जाधव, आनंद जेऊरकर, महेश गेजगे, उपस्थित होते.

10 जून रोजी दत्तनगर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी गरजूंना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते शंकर बेलगे, युवासेना पदाधिकारी मंदार यळवंदे, विनायक जमदाडे, ओंकार पुजारी, दिपसागर सोनकांबळे, मंगेश देशमाने, मयूर ढिले, अजय गायकवाड,विक्रम झेंडे, प्रशांत नखाते, आदित्य किरवे, अक्षय काकरे, विजय शिंदे, सुरज बारणे, ईश्वर कुमावत उपस्थित होते.

11 जून रोजी पवना नदी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पवना नदीपात्रातील गाळ, जलपर्णी काढण्यात आली. तसेच विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली. या प्रसंगी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, महापालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उद्योजक धनंजय चिंचवडे, युवासेना पदाधिकारी आकाश जाधव, अनिकेत रसाळ, अक्षय काकरे, सौरभ गोरे, अक्षय देवकते आदी उपस्थित होते.

12 जून रोजी पिंपरी, चिंचवड, वाकड येथील रिक्षा चालकांना कोरोना सुरक्षा कव्हर आणि अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, राम ठोंबरे, योगेश ननवरे युवासेना पदाधिकारी आकाश जाधव, महेश गेजगे, सुधीर सावंत, ओंकार तांबे आदि उपस्थित होते.

आज 13 जून रोजी रक्तदान शिबीराचे गणेशनगर, थेरगाव येथे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, विलास कामठे, अनंत को-हाळे, सामजिक कार्यकर्ते विलास जगदाळे, नंदू जाधव, धनाजी बारणे, चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, विजय साने, संदीप येळवंडे, चेतन शिंदे, माउली जगताप, मंदार येळवंडे, केदार चासकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *