पवारांनी काहीही निर्णय घेतला तर त्याची चर्चा होतेच

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑक्टोबर २०२१

आकुर्डी

जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

त्याबाबत आज पत्रकार परिषदेत आता पवारांचे भगवे राजकारण सुरू झाले आहे असे ? असे विचारले असता पवारांनी काहीही निर्णय घेतला तर चर्चा ही होणारच त्यात तुम्ही तसे छापले तर आम्हांला जाहिरात द्यावी लागणार नाही हे चांगलेच आहे. असे उत्तर शरद पवारांनी दिले. त्याचबरोबर भगवा कशाचे प्रतीक आहे असा सवाल करून भगवा हे शिव छत्रपतींच्या शौर्याचा त्या काळातील स्वातंत्र्याच्या व त्यागाचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामागे पूर्व इतिहास आहे त्याचे जतन व्हावे म्हणून हा ध्वज फडकवला आहे. त्यामुळे कोण्ही तिकडे जाईल असे काही समजण्याचे कारण नाही असे पवार साहेबांनी सडेतोड उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *