न्यू भोसरी रुग्णालयातील आय. सी. यू बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अड. नितीन लांडगे,  माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, स्थानिक नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, नगरसेवक रवी लांडगे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, विक्रांत लांडे, नगरसदस्या अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेट्टी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, ‍सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,  ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर   उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून  सुपुर्द करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे यांनी देशाचे जेष्ठ राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांना खाली वाकून चरणस्पर्श करत नमस्कार केल्याची क्लिप खूप व्हायरल झाली. व महापौर राष्ट्रवादी जाणार असल्याची चर्चाही रंगली परंतु माई यांनी शिष्टाचार पाळत शरद पवार साहेब हे सर्वच गोष्टीने श्रेष्ठ आहेत. त्यांच्या वयाचा मान सन्मान ठेवणे कर्तव्य आहे. उदघाटन प्रसंगी शहराचे प्रथम नागरिक या नात्याने मी तेथे उपस्थित होते. त्यांचे स्वागत केले. त्यांच्या वयाचा मान ठेऊन मी वाकून नमस्कार केला यात काहीच गैर नाही. यामुळे वेगळ्या गोष्टींची चर्चा होण्याची काहीच गरज नाही. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे आपली संस्कृती आहे. असे म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *