श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२१ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव या संस्थेला राज्य पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयते यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष सुनील श्रीवत, संचालक अनिल थोरात, नवनाथ चौगुले, ज्ञानेश्वर रासने, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. यावेळी संस्थेचे कर्मचारी ज्ञानेश्वर खराडे, सतीश भार्गव, प्रवीण मनसुख,अमोल औटी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कडून १०० कोटीच्या पुढे ठेवी असणाऱ्या गटात हा पुरस्कार दिला जातो. सन २०२१-२०२२ या सालाकरिता आमदार अतुल बेनके यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार मिळालेल्या व माजी आमदार वल्लभ बेनके यांनी १५ एप्रिल १९८८ रोजी स्थापन केलेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेने १८६ कोटीच्या ठेवी, १३२ कोटी कर्ज वाटप, ३०० कोटींचा मिश्र व्यवसाय, दीपावली भेट वस्तू, १५% लाभांश व २०० कोटीच्या ठेवी उद्दिष्टपुर्ती कडे वाटचाल केली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पतसंस्थेचे व सर्व संचालक मंडळांचे कौतुक सर्वत्र होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *