कसे झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, पवार साहेबांचा आकुर्डीत पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑक्टोबर २०२१

आकुर्डी

मी त्यांचा सक्तीने हात वर केला. त्यामुळे त्यांची निवड झाली.

आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले याचा अकुर्डीत पत्रकार परिषदेत गैप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे यांनी काल भाषण केले. त्यावर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे काहीही करून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते.

यावर आज शरद पवार यांनी:

उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते

“मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते त्यांची हात वर करायची तयारी नव्हती आणि मुख्यमंत्री व्हायचीही इच्छा नव्हती. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांचा हात पकडून वर करायला लावला. मी त्यांचा हात वर केला त्याचे सर्वांनी स्वागत केले. आणि मग त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवारांनी सांगितलं.

मी स्वत:च वर केला आणि हे नेतृत्व करतील असं जाहीर केलं.

“सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे आली होती. आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे पहात आमच्या आमदारांच्या बैठकाही झाल्या. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं गेलं. त्यावेळी माझ्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत:च वर केला आणि हे नेतृत्व करतील असं जाहीर केलं.” असे सांगितले.

बाळासाहेब ठाकरे हे माझे चांगले मित्र होते

“उद्धव ठाकरेंना मी वयाच्या तीन चार वर्षापासून ओळखतो. बाळासाहेब ठाकरे हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते. पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब अत्यंत दिलदार होते.या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं. शिवसेनेने योगदान दिलं. त्यामुळे जेव्हा सरकार बनविण्याची वेळ आली तेव्हा तीन पक्ष समोर होते. त्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे होते. त्यामुळे आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला भाग पाडावा ही माझी जबाबदारी होती.

“त्यामुळे मी त्यांचा सक्तीने हात वर केला. त्यामुळे त्यांची निवड झाली. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं,” असं त्यांनी बोलताना सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *