भूलतज्ञ संघटनेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

पिंपरी प्रतिनिधी
 १४ सप्टेंबर २०२२


सोसायटी ऑफ़ ॲनेस्थेशिओलॉजिस्ट पिं-चिं (भूलतज्ञ संघटना) व डी वाय वाय पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “मास्टरस्ट्रोक 2022” राष्ट्रीय स्तरिय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिषदेचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय भूलतज्ञ संघटनेचे उपाध्यक्ष डॉ अंजली भुरे , महाराष्ट्र भूलतज्ञ संघटना अध्यक्षा डॉ मनीषा काटीकर, महाराष्ट्र भूलतज्ज्ञ संघटना सचिव डॉ.अविनाश भोसले, डॉ सुखविंदर बाजवा आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी डॉ अंजली भुरे म्हणाल्या कि, वैद्यकीय क्षेत्रात अनेक तंत्रज्ञान बदलत आहे. डॉक्टरांनी बदलत्या तंत्रज्ञान आत्मसात करून  जनतेला वैद्यकीय सेवा दिली पाहिजेत.  अशा  कार्यशाळेमधुन नवीन तंत्रज्ञान शिकता येते.यामुळे अशाप्रकारच्या परिषदेमध्ये सहभागी झाले पाहिजेत. भव्यदिव्य परिषद आयोजन करण्यासाठी आयोजकांचे अभिनंदन केले. डॉ. काटीकर म्हणाल्या की,महाराष्ट्र राज्यात भूलतज्ञ संघटना खुप कार्य करीत असुन पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघतटनेचे त्यात मोठे योगदान आहे.

अशा प्रकारची 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजनासाठी सोसायटी ऑफ ॲनेस्थेसिओलॉजिस्ट पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष डॉ. माया भालेराव ,सचिव दीपक डॉ. शिंदे आयोजन समिती प्रमुख डॉ. सुमित लाड,सचिव डॉ.सीमा सुर्यवंशी , खजिनदार डॉ भावेश शेठ यांनी पुढाकार घेतला. दुसऱ्या दिवशी डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये विशेष कार्यशाळा पदव्युत्तर विद्यार्थ्यां करिता घेण्यात आली.या कार्यशाळेत प्रसूती किंवा सिझेरन ऑपरेशन दरम्यान होणारी गूंतागंत यावर भूलतज्ञ व प्रसूती तज्ञ यांच्या करीता सिम्युलेशन टेक्नॉलॉजी द्वारे आयोजित चर्चा करण्यात आली होती. भारतातील राष्ट्रीय भूलतज्ञ संघटनेच्या पश्चिम विभागीय परिषदेत सुमारे 500 पदवीधर विद्यार्थी,भूलतज्ञ सहभागी झाले होते.

डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे भूलतज्ज्ञ डॉ छाया सूर्यवंशी,डॉ पी.एस गर्चा आदीनी पुढ़ाकार घेतला व पेपर सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले.मास्टरस्ट्रोक या मसिकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्या मध्ये अनेक भुलतज्ञांनी भूल शास्त्रावर लेख लिहिले आहेत.अशी माहिती संपादक डॉ शुभांगी कोठारी यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ शोभा जोशी, डॉ रत्नदीप मार्कंडेय, डॉ सारिका लोणकर,कुंदा डिंबळे, डॉ शोभा व्हटकर, डॉ भाविनी शाह, डॉ आशिष पाटनी, डॉ नेहा पाटील, वाय सी एम च्या डॉ मनिषा सपाटे, डॉ जितेंद्र वाघमारे, इंद्रायणी हॉस्पिटलचे डॉ. सचिन वाघ यांचे विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उमा देशमुख व डॉ शुभांगी टेकूरकर तर आभार प्रदर्शन सचिव डॉ. दीपक शिंदे यानी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *