“न्यू इंग्लिश स्कुल. शिरोली बु. च्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना ” उजाळा

जुन्नर

न्यू इंग्लिश स्कुल . शिरोली बु॥ विद्यालयात ३५ वर्षानंतर १९८८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवार दिनांक १६ / ११ / २०२३ रोजी ” स्नेह मेळावा व गुरुजन कृतज्ञता सोहळा “सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री पाचे सर यांचे अध्यक्षतेखाली आणि सेवानिवृत्त शिक्षक -गोडसे सर , फटांगरे सर , ढोले सर . आर एम डुंबरे सर . माळी सर . कुलकर्णी सर , दौंडकर सर . वाघमारे सर , खैरे सर , थोरवे सर , देशमुख सर व पवार मॅडम आणि शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री . हांडे सर आदि गुरुजनांचे उपस्थितीत संपन्न झाला .


सर्वच शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना श्री . बबनराव थोरात यांच्या वतीने सन्मान चिन्ह ( ट्रॉफी ) देऊन गौरविण्यात आले . सर्वच शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत मांडले . मा. अध्यक्षांनी कितीही मोठे झाला तरी आई वडीलांची सेवा हाच आपला ठेवा आहे याची जाणीव करून दिली .
माजी विद्यार्थ्यांमधे राजेंद्र ढोमसे , संपत गायकवाड , प्रकाश सोमोशी , ज्ञानेश्वर देवकर, मनोहर कवडे , किरण हांडे , प्रविण उर्किडे , गणेश पडवळ ,प्रमिला बो-हाडे , निता कोरडे , मल्हारी बो-हाडे आणि बबनराव थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . सुनिल नलावडे यांनी आपल्या गायनाने सर्वांचे मनोरंजन करून दाद मिळवीली . शाळेला भाऊबीज भेट म्हणून ध्वनिक्षेपक आणि माजी विद्यार्थी करत असलेल्या शाळा दुरस्ती कामासाठी डॉ. राऊत आणि एल डी थोरवे सर यांचेकडे ३५५०० / रु. रोख जमा करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या लॅमिनेटेड ग्रुपफोटो फ्रेम मल्हारी बो-हाडे यांनी कार्यक्रमाची आठवण म्हणून सर्वांसाठी दिल्या . या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी – सदानंद उर्किडे, राजेश शेरकर , सुरेश थोरवे ,उल्हास कासार , महेंद्र बो-हाडे , जगदिश थोरवे , संजय मोरे , शशीकांत मोरे आणि संगिता शेरकर व लता थोरवे यांनी केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ललिता गाडेकर व संजय थोरवे यांनी केले तर शत्रूघ्न लबडे यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *