नारायणगव्हाण येथे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड केअर सेंटर व लसीकरण सुरू…

(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)

नारायणगव्हाण (पारनेर) –
दि. ११ मे २०२१
पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पारनेर तालुक्यातील गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे शिस्तबद्ध नियोजन, स्थानिक लसदूतांमार्फत करण्यात आलेय. त्याच पार्श्वभूमीवर नारायणगव्हाण येथेही शिस्तबद्धरीत्या लसीकरण झाले. यात नारायणगव्हाण सह वाडेगव्हाण येथील सुमारे १६० जणांनी लस घेतली. सतीश भालेकर यांनी गावनिहाय नियोजन करून त्यांना सर्व लसदूत व गावपुढाऱ्यांनी सहकार्य केले.

    या लसीकरण मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी अभियंता सतीश भालेकर, नारायणगव्हाण च्या सरपंच मनीषा रामदास जाधव, उपसरपंच राजेश भानुदास शेळके, विनायक शेळके, सुरज खरात, सागर पठारे, विशाल कांडेकर, डॉ बागल, डॉ गुंजकर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

कोव्हिड केअर सेंटर ही सुरु
पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने, नारायणगव्हाण व पंच क्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून, कोव्हिड केअर सेंटर देखील गाव पुढारी तसेच दानशूर व्यक्तींच्या आर्थिक, अन्नधान्य व वस्तुरूपी सहकार्यातून सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचे आवाहन सोशल मीडिया मधून करताच, अक्षरशः गावातून व तालुक्यातून अनेकांनी भरघोस अशी मदत केल्याचे उपसरपंच राजेश शेळके यांनी सांगितले.
या कोव्हिड केअर सेन्टरच्या उदघाटन प्रसंगी डॉ अखिलेश राजूरकर, डॉ विशाल महाजन, डॉ रवींद्र पठारे, त्याचप्रमाणे नारायणगव्हाण येथील उपकेंद्रातील डॉ गुंजकर, नेमाने मॅडम, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच सदस्य व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत सरपंच मनीषा जाधव यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार उपसरपंच राजेश शेळके यांनी मानले.
या दोन्ही प्रसंगी ग्राम पंचायतच्या आजी माजी सदस्यांनी, तसेच आजीमाजी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे सुनील खोले, जयवंत भोसले, राजेंद्र भंडारी, हर्षल चिपाडे, मेजर संदीप कांडेकर, मेजर तानाजी पवळे, शुभम काळे, शाहरुख शेख, संग्राम कांडेकर, अक्षय कांडेकर, कल्पेश कांडेकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

  【नारायणगव्हाण येथे जिद्दीने व सर्वांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या मोफत कोव्हिड केअर सेंटरला व ते सुरू करणाऱ्या सर्वच ग्रामस्थांना, आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तसेच एक आवाहन करण्यात येत आहे की,  लोकांच्या अशाच प्रकारच्या मदतीची अनेक गरिबांना गरज आहे, आपण डोळसपणे अशा सर्व गरजूंना मदत करा.】

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *