पवार कुटुंबीयांचा “गड पिंपरी चिंचवड पालिका” परत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवारच मैदानात

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

पिंपरी चिंचवड हा पवार कुटुंबीयांचा “गड ” मानला जातो. पिंपरी चिंचवड वर पवार कुटुंबियांचे विशेष प्रेम आहे. ही पालिका राष्ट्रवादी च्या हातातून गेल्याचे शल्य पवार कुटुंबियांबरोबर येथील स्थानिक नेत्यांनाही आहे. म्हणूनच या तटाची भक्कम बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून  दोन दिवसीय पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. आगामी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पालिका मिशन २०२२ हे या दौऱ्यांचे मुख्य कारण असल्याचे बोलले जाते. उद्या ते आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. तर रविवारी भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास व नवचैतन्य वाढेल असे बोलले जाते. सध्या निस्तेज वाटणाऱ्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच जोश व उत्साहाचे वातावरण या दौऱ्यामुळे येईल असे जाणकारांना वाटते. पालिकेत सत्ताधाऱ्या भाजपचा असलेला अनोगोंदी व भ्रष्ट कारभार, सत्ताधारी भाजपचे च नगरसेवकच होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणतात खरे तर हे काम विरोधकांचे आहे. त्यांचे काम सत्ताधारी काही नगरसेवक करतात . मग आपले नगरसेवक मूग गिळून ? आशा आणि अनेक प्रश्नावर शरद पवार काय बोलणार व कोणाकोणाचे कान टोचनार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा पवार यांचा दौरा असणार आहे. आज शरद पवार हे आमदार अण्णा बनसोडे  यांच्या कार्यालयात सरकारी योजनांच्या नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करतील. त्यानंतर निगडीतील दुर्गाचौक येथील काळभोरांच्या सिजन्स बॅक्वेट हॉलमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील.  रविवारी रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत पत्रकारांबरोबर संवाद साधतील नंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे माजी पक्षनेते जगदीश शेट्टी यांनी सांगितले.

पवार यांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे यांची उपस्थिती असणार आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पवार कुटुंबियांचे नाक असलेल्या या महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी पक्षाकडून मिशन २०२२ ची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपासमोर नक्कीच कडवे आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *