आयुक्त राजेश पाटील यांचा आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी धडाकेबाज निर्णय…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २६ मे २०२१
शहरातील सर्वच सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राखीव करण्यात आली आहेत. पण आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. परंतु एखाद्या नागरिकाला कोरोना सोडून दुसऱ्या कोणत्याही आजारावर उपचार घ्यायचे असतील तर सरकारी दवाखान्यांमध्ये अशा सेवा दिल्या जात नाहीत. ही बाब राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव पाटील यांनी आयुक्त राजेश पाटील यांना त्यांची भेट घेउन बोलून दाखवली. राजेश पाटील यांनी तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर वाबळे यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. आयुक्तांनी डॉक्टर वाबळे यांना २८ मेपर्यंत यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयामध्ये ओपीडी सुरु करण्याचे आदेश दिले. माधव पाटील यांचा मुद्दा पटल्याने आयुक्तांनी ताबडतोब आदेश दिल्याने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.
माधव पाटील यांनी आपली भूमिका मांडताना म्हणले की खाजगी रुग्णालयांचे दर सर्वांना परवडण्यासारखे नाहीत. लवकरच पावसाळा येत आहे. पावसातून डासांची उत्पत्ती होवून त्याद्वारे आजारांचा उपद्रव सुरु होतो. डासांचा हा उपद्रव पावसाळ्यात त्यात कित्येक पटींनी वाढ झालेली दिसून येते. सर्वसाधारणपणे सर्वांना परिचित असणाऱ्या हिवताप अर्थात मलेरियासोबतच चिकनगुणिया आणि डेंग्यूसारखे आजार पसरविण्याचे काम डासांमार्फत होते. तसेच इतर आजारांमुळे नागरिकांना दवाखान्यात जावेच लागेल अशा परिस्तिथी सरकारी दवाखान्यात ओपीडी सुरू असावी हे माधव पाटील यांनी आयुक्तांना सांगितले.