पिंपरी । कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांसाठी मेडिकल बुलेटीन सुरू करा – अतुलसिंह परदेशी अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया…

प्रति,
दि.25/04/2021

मा.राजेश टोपे
आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य…

कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांसाठी मेडिकल बुलेटीन सुरू करा – अतुलसिंह परदेशी अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया…

*कोवीड रूग्णालयात cctv बसवणे बाबत*…

   देशभरात कोवीड च्या दुस-या लाटेने थैमान घालत अनेकांचे प्राण घेतले आहे तर लोखो नागरीकांना कोरोनाने  वेढा घातला आहे.अशा परिस्थितीत सरकारी जम्बो कोवीड सेंटर असो की खासगी कोवीड सेंटर असो याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागल असल्याने दिवसभरात दोन वेळ तरी रूग्णांची सविस्तर माहीती मिळावी यासाठी राज्यसरकारने मेडिकल बुलेटीन सुरू करावे तसेच कोवीड सेंटर मध्ये cctv बसवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रव्यवहार करून केली आहे…
      जम्बो कोवीड सेंटर असो की,खासगी कोवीड सेंटर असो याठिकाणी उपचार घेत असलेल्या रूग्णांची काळजी त्या नातेवाईक यांना असते.कोवीड रूग्ण म्हटले की त्यांचा बरे होण्याचा कालावधी कमीत कमी पंधरा दिवस किवा त्यापेक्षा जास्त असा असतो.अशा परिस्थितीत कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड ही होते.नातेवाईकांना रूग्णालय परिसरात थांबायची नीट सोय नसते आणि थांबले जरी तरी त्यांना ही कोवीड होण्याचा धोका जास्त असतो.अशाही परिस्थितीत रूग्णांचे नातेवाईक जीवाची पर्वा न करता डाॅक्टरांच्या संपर्कात राहून रूग्णांची विचारपूस करीत असतात.दिवसभर रूग्णसेवेत व्यस्त असणा-या डॉक्टराना
रूग्णांच्या नातेवाईकांनाही समाधानकारक उत्तर द्यावी लागतात आणि यातही डाॅक्टरांचा बराचसा वेळ वाया जातो…
   अशातच डाॅक्टरांवरील वाढता ताण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णांची योग्य माहीती मिळावी ह्यासाठी  दिवसभरात दोन वेळा तरी मेडिकल बुलेटीन देण्यात यावी सोबतच कोवीड सेंटर मध्ये cctv बसवून रूगांना नेमके काय उपचार दिल्याजात आहे जेवन वेळेवर दिल्या जात आहे का?सध्या रूग्ण कसा आहे हे ही नातेवाईकांना समजेल यासाठी कोवीड सेंटर मध्ये cctv बसवने व दिवसभरात दोन वेळा मेडिकल बुलेटीन सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे…