उद्या घोडेगाव/ आंबेगावकर घडवणार वाहतूक शिस्तीचे दर्शन- घोडेगाव पोलिसांची माहिती

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ ऑक्टोबर २०२१ 

घोडेगाव

उद्या दिनांक.१५/१०/२०२१ रोजी घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी निवासी इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन व पंचायत समिती आंबेगाव या कार्यालयाचे उद्घाटन व सभा कार्यक्रम मा.ना.श्री अजितदादा पवार सो. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील सो. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.ना.श्री.हसन मुश्रीफ सो.व त्यांचे समवेत इतर मंत्री महोदय येणार आहेत.

सदर उद्घाटन व सभा कार्यक्रम हा विजयादशमी (दसरा) या दिवशी घोडेगाव शहरांमध्ये होणार असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोडेगाव शहरात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे, वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होऊ नये याकरिता आंबेगाव, जुन्नर ,खेड ,शिरूर तसेच इतर तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवरांना घोडेगावच्या पोलिसांनी विनंती आहे, वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सदर ठिकाणी आपले वाहन व्यवस्थित रित्या पार्क करून कार्यक्रम ठिकाणी पायी जावे व प्रशासनास सहकार्य करावे.

१) मंचर बाजूकडून येणारी वाहने बाजार समिती मार्केट यार्ड, घोडेगाव येथे आपली वाहने पार्क करावी.

२) ढाकाळे ,वाडा, खेड मार्गे येणारी वाहने शासकीय गोडाऊन काळेवाडी- दरेकरवाडी येथील मोकळ्या जागेत आपली वाहने व्यवस्थितरीत्या पार्क करून घेतील.

३) भीमाशंकर, तळेघर, आहुपे, बोरघर या भागातून येणारी वाहने अमित गेस्ट हाऊस व वनमाला मंगल कार्यालय येथे आपली वाहने व्यवस्थित रित्या पार्क करावीत.

उद्या घोडेगाव/ आंबेगावकर घडवणार वाहतूक शिस्तीचे दर्शन- घोडेगाव पोलिसांची माहिती
उद्या घोडेगाव/ आंबेगावकर घडवणार वाहतूक शिस्तीचे दर्शन- घोडेगाव पोलिसांची माहिती

शिस्तबद्ध वाहतूक नियमनाकरिता आपण आपले वाहन योग्य ठिकाणी पार्क करणे आवश्यक आहे. कार्यक्रम संपल्यानंतर होणारी गर्दी व वाहतूक कोंडी यामध्ये आपला बहुमूल्य वेळ वाया जाणे पासून वाचवण्यासाठी आपण दिलेल्या ठिकाणीच आपली वाहने पार्किंग करावी.

आम्ही आंबेगावकर कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यातील शिस्तबद्धपणा सगळ्यांना दाखवून देऊ व भीमाशंकर मंदिराकडे जाणारे लोक ,दसरा सणानिमित्त बाजारासाठी येणारे लोक आणि शुक्रवारी घोडेगावचा असणारा बाजार त्याचबरोबर सभेकरिता येणारे लोक या सगळ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात येणार आहे अशा प्रकारे नागरिकांनी खबदारी घ्यावे असे आवाहन साहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांच्या कडुन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *