गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०६ सप्टेंबर २०२२

आंबेगाव


समर्थ भारत परिवार, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ आणि आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित व्रतस्थ पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या कर्मवीर सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना गुणासोबतच ज्ञाप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले, पोलीस पाटील संघाचे गोरक्षनाथ नवले पाटील, सत्कर्म फाउंडेशनचे दत्तात्रय सावंत, जीवनविद्या मिशनच्या सौ. मीनाक्षी बेंडे आदींना अविरत सामाजिक कार्यासाठी व्रतस्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आंबेगाव तालुक्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील दहावी आणि बारावीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. स्पिरिचुल पॉवर प्रा. ली चे संस्थापक आणि लेखक अतुल गुंजाळ यांच्या लेखणमुद्रा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या सन्मान सोहळ्यास भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष, डॉ. समीर राजे पठाण, खेड विभागाचे उपविभागीय पोळी अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस पाटील संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ नवले पाटील, समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बर्वे, शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, मुख्याध्यापक संघाचे प्रदेश प्रवक्ते गणपुले, आंबेगाव तालुकाध्यक्ष अशोक वळसे, सचिव बोंबले, सुनील वळसे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ. अतुल साबळे, सचिव विलास भोर, उपाध्यक्ष तथा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष उत्तम टाव्हरे, संपर्कप्रमुख भानुदास बोऱ्हाडे, दै. सकाळचे प्रतिनिधी अविनाश घोलप, पुण्य नगरीचे विभाग प्रमुख मनोज तळेकर, दै. पुढारीचे अरुण गोरडे, रमेश राजगुरू, पत्रकार महासंघाच्या नियोजन समितीचे सचिव विजय साळवे, धनंजय पोखरकर, समीर गोरडे, माय टीव्ही चे संपादक अबिद शेख, दै. सामनाचे जयेश शहा, मुख्याध्यापक प्रकाश इंदोरे, सदाशिव मोटे, उच्च माध्यमिक चे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, पंडितराव कातळे आदि मान्यवर उपस्थित होते.


या सन्मान सोहळ्यात खेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे प्रदेशशाध्यक्ष डॉ. समीर राजे पठाण, शरद बँकेचे संचालक अजय घुले, पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ नवले पाटील, मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, आदर्श मुख्याध्यापक सुनील वळसे, पुण्य नगरीचे मनोज तळेकर आदि मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष अशोक वळसे यांनी केले, निवेदन अमित काचळे यांनी केले तर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद बोंबले यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *