नारायणगाव येथे गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
६ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव

पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील अवैध रीत्या सुरू असलेल्या गुटखा आणि इतर अमली पदार्थांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी खास मोहीम राबवली होती. त्या संबधीच्या सूचना आणि आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. या अनुषंगाने दि. ०४/१०/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पाबळ रोड ता.खेड गावच्या हद्दीत पाबळ ते खेड रोड वर देवी टायर वर्क्स च्या समोर इस्माईल अन्सारी हा पांढऱ्या रंगाच्या छोटा हत्ती या वाहनात बसलेला असून या वाहनात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने या ठिकाणी पोलीस पथकासह सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखविल्या नंतर त्याने त्याचे नाव इस्माईल गबिनूर अन्सारी वय ३७ वर्ष रा.राक्षेवाडी ता. खेड जि .पुणे असे सांगितले. त्याच्या ताब्यातील वाहन क्र.एम एच १४ डि एम ०८८९ या वाहनाची पंचांसमक्ष पाहणी केली असता या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आणि पानमसाला मोठ्या प्रमाणात मिळून आला.

स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई

या इसमाच्या ताब्यातून गुटखा पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन असा मिळून २ लाख ८१ हजार ६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी खेड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. ही कार्यवाही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, काशिनाथ राजापुरे, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, खेड पोलीस स्टेशनचे अधिकारी भोसले, पोलिस हवालदार भोईर, चौधरी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *